समिती नोंदणी क्रमांक : ए.पी.एम.2073/13726/(III) दि.18/07/1973
समितीची स्थापना : दि. 12/12/1972
समिती नोटीफीकेशन : 382 दि. 01/02/1973
प्रत्यक्ष कामकाज सुरूवात : दि. 17/07/1974 पासुन
समितीचे कार्यक्षेत्र : पुर्ण कुही तालुका, 185 गावे
कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती : 58
कार्यक्षेत्रातील नगरपंचायत : 01
कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी संस्था : 46
- संस्थेकडे असलेली जमीन
- मांढळ : 4.85 एकर
- कुही : 10.00 एकर
- वेलतूर : 2.72 एकर
- एकुण : 17.57 एकर
समितीचे मुख्य बाजार आवारामध्ये ऑफीस इमारत, चेक पोस्ट, सिमेंटची वॉल कंपाउड, विहीर, बोरवेल, शेतकऱ्यांना पाणी पिण्यासाठी थंड पाण्याची सोय (फ्रीजर), संपुर्ण इलेक्ट्रानीक वजनकाटे, भुईकाटा (धरम) काटा 50 मे. टन क्षमतेचा, 5 लिलाव शेड, गुरांना पाणी पिण्यासाठी टाका, विद्युत व्यवस्था, गोदाम 200 मे. टन क्षमतेचे, टिकर बोर्ड, तक्रार पेटी, संडास, फ्लोअरींग, जनरेटर इत्यादी सुविधा केलेली आहे. तसेच समितीचे मांढळ येथील बाजार आवारात 1000 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम पुर्ण झालेले असुन. शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्याचा शेतमाल भाडे तत्वावर ठेवण्यात येत आहे.
समितीचे उपबाजार म्हणुन कुही येथे दि. 19/05/2005 रोजी घोषीत केलेले असुन समितीने 200 मे. टन क्षमतेचे 1 गोदाम, रस्ता तसेच शासनाचे माध्यमातून विहीर, अंतर्गत रस्ता, स्वच्छता गृह व मुतारी इत्यादी बांधकाम केलेले आहे. तसेच समितीचे आवाराला दोन बाजुने तारांचे कंपाऊंड केले असुन दोन बाजु बाकी आहेत. मागील चार वर्षापासुन समितीने उपबाजार कुही येथे कापुस बाजार व धान्य बाजार सुरू केलेला असुन शेतकऱ्यांचे सध्या भरपूर प्रमाणात सहकार्य मिळत आहे. समितीकडे स्वनिधी नसल्यामूळे सुविधा करण्यास अडचन जात आहे. तरीही समितीने सन 2017-18 या वर्षात 50 मे.टन क्षमतेचा भुईकाटा बांधकाम केलेले असुन सदर काटयावर मोजमाप सुरू आहे.समितीने 9x12 मिटर आकाराचे लिलाव ओटा व त्यावर शेड बांधकाम पूर्णत्वास येत आहे. तसेच या चालू वर्षात एक 40X22.50 मिटर आकाराचे. खाली जागेवर फ्लोअरींगचे बांधकाम करण्याचा समितीचा मानस असुन सदर कामाची निवीदा प्रक्रिया सुरुआहे. तसेच उपबाजार कुही येथे शासनाचे 50% अनुदान तत्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधकामास मंजुरी मिळाली असुन निवीदा प्रक्रीया सुरू आहे.
समितीने कापूस (सरकी काढलेला व न काढलेला), ओली व वाळली मिरची, गहू, ज्वारी, धान(भात), सोयाबिन, तूर, चना, तिळ, अंबाडी, पोपट, सुर्यफुल, मुंग, उळीद, लाख, धना, गवत व गुरांचे वैरन, गुरेढोरे तसेच शेळया-मेंढया इत्यादींचे नियमन केलेले असुन सदर मालाचे खरेदीवर खरेदी दाराकडून शेकडा 1.00 रुपया बाजार फी व 0.05 पैसे शासकिय देखरेख फी वसुल करीत असते व कापूस या शेतमालावर बाजार फी व देखरेख फी एकुण 0.80 पैसे व्यापाऱ्याकडून वसुल केली जाते.
